khabarbat

khabarbat logo

Join Us

nanded hospital death

Advertisement

Hospital Death : नांदेड मधील मृत्युकांड प्रकरणी डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 

महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात मृत्यूचे तांडव सूरू असतानाच नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश होता.

नांदेडच्या (nanded) कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. (Marathi Batmya)

nanded hospital death

कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगितले. रक्त व इतर तपासण्यासाठीही देखील पैसे खर्च करावे लागले. (nanded news) अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये २२ वर्षीय अंजली वाघमारे हिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. शनिवारी तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

जाहिरातीचं विश्वसनीय माध्यम : खबरबात.com । Call 99605 42605
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »