khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे

सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे.

जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला असून मंदिराच्या गर्भगृहातील काम अंतिम टप्यात आले आहे. तीर्थक्षेत्र जेजुरी करिता सुमारे ३४९ कोटी ४५ लक्ष रुपयांचा निधीही सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला.

सुमारे ३०० वर्षा नंतर एवढ्या मोठ्या निधीच्या माध्यमातून गड, मंदिरं आणि परिसराचा जीर्णोद्धार होत आहे. आपल्या कुलदैवताला पुन्हा जुन्या देखण्या स्वरूपाची झळाळी मिळणार असल्याचे समाधान जेजुरी ग्रामस्थ मानकरी गावकरी खान्देकरी, गुरव, पुजारी, सेवक, कर्मचारी वर्गासह राज्यातील भविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Renovation of Jejuri Gad is going on to much quick and fast.

सध्या गडाचा प्रथमदर्शनी भाग आतील रंगमहाल, ओवऱ्या, दगडी मनोरे यांची साफ – सफाई करण्यात आली, असून गडाचे पूर्व वैभव देखण्या स्वरूपात हळूहळू प्रकट होत आहे. सरदार मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, मालोजीराजे, भोसले परिवाराच्या काळातील सुंदर देखण्या दीपमाळा, गडकोटचा झालेला जीर्णोद्धार तत्कालीन गड-मंदिर गाभारा सौदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल अशी किमया पुरातत्व विभाग प्रमुख श्री. वाहने तसेच अभ्यासक, कारगिर करीत आहेत.

संपूर्ण आराखड्यानुसार गडपरिसराचा तीन टप्यात जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिरं, गाभारा पूर्ण तटबंदी जतन आणि दुरुस्ती करण्यात येणार असून याकरिता ११ कोटी २२ लाख ९६ हजार ७३३ रुपयांची तरतूद केली आहे. उर्वरित निधीतून मंदिरं आणि गड लगत परिसरातील ऐतिहासिक वास्तू, वस्तू, तत्कालीन सोय-सुविधा असलेला होळकर कालीन तलाव, पेशवे कालीन तलाव, छोटी मंदिरे, जयाद्री डोंगर, कडेपठार, पायरी मार्ग इत्यादिचा समावेश आहे.

देवसंस्थान कमिटीचे अध्यक्ष पोपट खोमणे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, विश्वास पानसे, पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, आणि अनिल सौन्दडे तसेच गुरव, पुजारी, कोंळी, घडशी, वीर समाजाने आणि ग्रामस्थ, खान्देकरी, मानकरी, सेवेकरी कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

आपल्या गावची बातमी : khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like