khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

२२ अब्जाधीशांनी गमावले ३०,०१,९८,३१,५८,००० रुपये

 

जगभरातील शेअर बाजारात (stock market) बुधवारी मोठी घसरण झाली. त्यामुळे २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत देखील एकाच  वेळी मोठी घसरण पहायला मिळाली. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामुहिक ३ लाख कोटी रुपयांची म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले.

इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नोल्ट यांचे सर्वाधिक नुकसान झाले; तर भारतातील (Ambani) अंबानी, अदानी (Adani) यांच्यासह टॉप १४ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली.

(सौजन्य : Bloomberg Index)

जगातील २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी घसरण झाल्याचे असे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. इलॉन मस्क (elon musk) ते गौतम अदानी यांच्यापर्यंत जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

जर आपण डॉलरमध्ये याचा विचार केला तर हा आकडा ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भरतो. इलॉन मस्क यांच्याशिवाय जेफ बेझोस, झुकेरबर्ग, बिल गेट्स, अंबानी आणि भारतातील अदानी यांचाही या यादीत समावेश आहे.

मस्कच्या संपत्तीत सर्वाधिक घट

टॉप १० अब्जाधीशांमध्ये सर्वात मोठी घसरण इलॉन मस्कच्या संपत्तीत दिसून आली. बुधवारी, मस्कची एकूण संपत्ती सुमारे ५ अब्ज डॉलरने कमी होऊन २३३ अब्ज डॉलर झाली.

मस्कच्या नेट वर्थमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे दिसून आले. तसेच बर्नार्ड अर्नोल्टच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३.५२ डॉलर्सने घट झाली.

वॉरेन बफेच्या संपत्तीत सर्वात कमी घट झाली. त्यांचे केवळ ४१६ दशलक्ष एवढे नुकसान झाले. तर लॅरी एलिसन, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह बाल्मर, सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत २ ते ३ अब्ज डॉलरची घट झाली.

अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १.२७ अब्ज डॉलरची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ९४.५ बिलियन डॉलर झाली.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.०८ अब्ज डॉलरची घट झाली आणि एकूण संपत्ती ६२.८ बिलियन डॉलरवर आली. या दोघांशिवाय शापूर मिस्त्री, शिव नादर, अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल यांसारख्या १९ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट दिसून आली.

आपल्या उपयोगाची बातमी khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »