अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आदिपुरुष adipurush चित्रपटातील आक्षेपार्ह संवादाच्या मुद्यावर सुनावणी झाली. ज्या पात्रांची पूजा केली जाते असे रामायण कसे विनोदासारखे दाखवण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले.
सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट कसा संमत केला? चित्रपट प्रदर्शनास संमत केला जाणे ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना फक्त पैसे कमवायचे असतात कारण पिक्चर हिट होतो, असेही न्यायालयाने म्हटले.
तुम्ही कुराणवर एक छोटीशी डॉक्युमेंट्री तयार करून त्यात काही चुकीचे दाखवा, मग काय होऊ शकते हे तुम्हाला कळेल? कुरआन, बायबललाही हात लावायला नको. मी स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही धर्माला स्पर्श करू नका. कोणत्याही धर्माचे चुकीच्या पद्धतीने वर्णन, मांडणी करू नका.
न्यायालय कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. न्यायालय सर्व लोकांच्या भावनांचा आदर राखते, दरम्यान, मंगळवारी लखनऊ खंडपीठाने म्हटले की, प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने हिंदूंनी कायदा हातात घेतला नाही.
आदिपुरुष adipurush चित्रपटाच्या निर्मात्यांनी भगवान राम आणि भगवान हनुमानासह धार्मिक पात्रे आक्षेपार्ह पद्धतीने सादर केल्याबद्दल न्यायालयाने टीका केली. न्यायालयाने चित्रपटाचे सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या खटल्यात पक्षकार म्हणून उभे करण्याचे निर्देश दिले. त्यांना नोटीस बजावण्यासोबतच आठवडाभरात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.