khabarbat

khabarbat logo

Join Us

imran khan

Advertisement

Imran khan : इम्रान खानला अटक होणार

 

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

इम्रान खानने सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचे पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झाले.

अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहे. दरम्यान, पोलीस पथकाला तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या समर्थकांचा सामना करावा लागू शकतो. यापूर्वी इस्लामाबाद पोलिसांना (Islamabad Police) त्यांच्या पक्ष प्रमुखांच्या निवासस्थानी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दावा केला की, तोशाखाना प्रकरणात अटक टाळण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या लाहोरमधील निवासस्थानाच्या भिंतीवरून उडी मारून शेजारच्या घरात आश्रय घेतला होता. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस काल लाहोरला दाखल झाले होते. मात्र आज कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like