khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

देवगिरी बँकेस प्रथम पुरस्कार

 

औरंगाबाद : ३००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेस अविज पब्लिकेशनच्या बँको ब्ल्यु रिबन सेरेमनी २०२२ चा अर्बन बँक कॅटेगरी- उत्कृष्ट बँकेबाबतचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी, महाबळेश्वर येथे पार पडला. सदर सोहळ्यास देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बँकेतर्फे सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेच्या मयुरपार्क शाखेचे शाखाधिकारी श्री. अनिरुध्द जाधव व अधिकारी हे उपस्थित होते. बँकेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे व सर्व संचालक मंडळ यांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

तुमच्या उपयोगाची बातमी- khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »