khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

सरकारी बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ??

 

मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली असतानाच अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या दिग्गज सरकारी बँका आता गोत्यात आल्या आहेत. ज्या वेगाने गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण होत आहे, त्याच वेगाने या बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत.

LIC चे सर्वाधिक नुकसान

अदानीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या LIC म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला दुहेरी फटका बसला. LIC ची अदानी समूहाच्या ५ कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्समध्ये LIC ने गुंतवणूक केली. २३ जानेवारी रोजी या गुंतवणुकीचे एकूण मूल्य ७२,१९३.८७ कोटी रुपये होते, ते ऑगस्टमध्ये २६,८६१.८८ कोटी रुपयांवर आले.

अदानीच्या समभागांच्या घसरणीनंतर एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य ६२ टक्क्यांनी घसरले. अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या एलआयसीच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

२४ जानेवारी रोजी एलआयसीच्या शेअर्सचे मूल्य ७१४.५० रुपये होते, जे २४ फेब्रुवारीला ५९०.९० रुपयांवर घसरले. एलआयसीचे शेअर्स एका महिन्यात १२३ रुपयांनी किंवा १७ टक्क्यांनी घसरले.

SBI गडगडला :

गौतम अदानी यांच्या कंपनीला झालेल्या तोट्याचा परिणाम SBI वरही झाला आहे. अदानींनी एसबीआयकडून सर्वाधिक कर्ज घेतले. अदानीवरील कर्जाचा बोजा पाहता एसबीआयच्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जर अदानी कर्जाची परतफेड करू शकले नाही तर बँकेचे मोठे नुकसान होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे, त्यामुळे एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. SBI चे समभाग १४ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. SBI चा शेअर २३ जानेवारीला ६०४.६० रुपये होता, तो २३ फेब्रुवारीला ५२१ रुपयांवर घसरला.

बड्या बँका दिवाळखोरीत ??

इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर १७ टक्क्यांनी घसरले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर्स एका महिन्यात १६.४७ टक्क्यांपर्यंत घसरले. पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स एका महिन्यात १५.६% पर्यंत घसरले आहेत.

याशिवाय बँक ऑफ बडोदाचे एका महिन्यात २ टक्क्यांनी शेअर्स घसरले आहेत. म्हणजेच हिंडेनबर्ग अहवालामुळे केवळ अदानीच नाही तर संबंधित सर्व घटकांना धक्का बसला आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी – khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »