khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

नंदुरबारच्या ओमचा Apple मध्ये डंका

 

नंदुरबार : आपल्या लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित नसल्याची त्रुटी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने शोधून काढली. ओम तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने डेमो व्हिडीओसह संबंधित तक्रार कंपनीकडे पाठवली. Apple च्या अधिकाऱ्यानी त्रुटी मान्य करीत ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ओमला (१३.५ हजार डॉलर) ११ लाख रूपये बक्षिस दिले आहे.

ओम हा खापर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुण्यात संगणक शास्त्राचे शिक्षण घेत आहे. गुगल हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून ओळखला जातो. मात्र ओमने हा भ्रमाचा भोपळा फोडला. त्याने लॅपटॉपसोबत खेळत त्यातील डेटा सुरक्षेसंबंधीत एक बग शोधला.

ओमने चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंद असताना लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले. त्यावरील उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून तो पाठवत राहिला.

या संदर्भात ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाय करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे. तुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी- khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »