मुंबई : अदानी समूहाच्या शेअर्सवरील संकट आजही सुरूच राहिले. अदानी समूहाच्या सर्व १० लिस्टेड शेअर्समध्ये आज जोरदार विक्री होत राहिली.
गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण होत राहिली, कारण गुंतवणूकदार विक्रीच्या मानसिकतेत आहेत. आज, अदानी समूहाच्या शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे.
अदानी समूहाच्या इतर शेअर्सची स्थिती :
अदानी टोटल गॅस ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटनंतर ८३३ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता. याशिवाय अदानी विल्मारमध्येही ५ टक्क्यांनी घसरण होत राहिली, ती प्रति शेअर ३९०.३० रुपयांवर व्यवहार करत होता.
अदानी एंटरप्रायझेस Top Loser :
अदानी एंटरप्रायझेस ही या समूहाची प्रमुख कंपनी आहे. अनेक क्षेत्रात काम करणारा अदानी समूह आज सर्वाधिक तोट्यात आहे, आणि १० टक्क्यांहून अधिक घसरणीवर आहे.
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला तो ५३९.०५ रुपये प्रति शेअरवर अडकला. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर, प्रति शेअर ७८९.२० रुपयांवर ट्रेडिंग होताना दिसले.
अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्च या अमेरिकन कंपनीचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत.
२५ जानेवारीला हा अहवाल समोर आला आणि तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्सची पडझड सुरू झाली. तेव्हापासून अदानी समूहाच्या १० कंपन्यांचे मार्केट कॅप ११.५ लाख कोटी रुपयांवरून ७.६९ लाख कोटी रुपयांवर आले आहे. (आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हि स्थिती होती.)