फ्लोरिडा : जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या मुली, तरुणींवर जबरदस्ती, अत्याचार करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही अलीकडच्या काळात काही घटना चर्चेत आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे Ladies special जिममध्ये देखील पुरुष प्रशिक्षकाकडून जबरदस्ती करण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे महिलांनी सतर्कपणे प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर सध्या फ्लोरिडातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जीममध्ये एका तरूणीवर जबरदस्ती करणाऱ्या एका तरूणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २४ वर्षाच्या नशाली अलमा हिच्यासोबत हा प्रकार घडला असून सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत.
ही घटना २२ जानेवारी रोजी घडली. नशाली एकटीच जीममध्ये व्यायाम करत असताना जीमच्या दरवाज्यावर कुणीतरी तरूण उभा असल्याचे तिला दिसले त्यानंतर तिने जीमचा दरवाजा उघडला आणि आपले काम करू लागली. पण हा तरूण या तरूणीच्या जवळ आला आणि तिच्याशी शारिरीक लगट करू लागला. या अनपेक्षित प्रसंगामुळे तिने वेळीच स्वतःला सावरले आणि जबरदस्ती करू पाहणाऱ्या तरुणाचा धिटाईने मुकाबला केला.
Un sujeto intentó violar a una joven en un gimnasio d Florida, según un video divulgado x la Policía. Nashali Alma estaba sola en el gimnasio d los apartamentos cuando le abrió la puerta al tipo q había visto antes x el lugar. Ella logró defenderse y huir. La policía lo capturó😰 pic.twitter.com/kQpGEuhR8Y
— 🄸🅅🄾🄽🄽🄴 🄻🄰🄶🄾🦉 (@ivonnelago) February 17, 2023
झेवियर थॉमस जॉन्स असे या तरूणाचे नाव असून त्याने तिला मिठीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. तरूणाने जबरदस्ती करण्यास सुरूवात केल्यानंतर तिनेही हिंमत न हारता त्याच्याशी लढायचे ठरवले आणि त्याची चांगलीच धुलाई केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी नशालीच्या हिंमतीचे कौतुक केले आहे. झेवियर थॉमस जॉन्स याला अटक करण्यात आली आहे.