khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?

मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे.

जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. परिणामी हे लोक ठरलेल्या वेळेत हप्ते देऊ शकतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली. जर हप्ता थकला तर बँका जो दंड (penalty) लावतात तोच बंद केला तर अशा विचारात आरबीआय आहे.

सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर वार्षिक व्याजाच्या तुलनेत १ ते २ टक्के दंड आकारतात. जर आरबीआयने हा निर्णय घेतला तर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. आरबीआयनुसार बँका ज्या प्रकारे दंड आकारतात त्याची संपूर्ण माहिती वेगळी द्यावी लागणार आहे.

ईएमआयवरील Late Fee पारदर्शक पद्धतीने वसुल केली जाणार आहे. आरबीआयने ८ फेब्रुवारीला ‘मॉनिटरी पॉलिसी’च्या बैठकीत याबाबत लवकरच एक मार्गदर्शक मसुदा तयार केला जाणार असल्याचे म्हटले होते. कोणताही दंड penal interest च्या रुपात वसुल केला जाणार नाही. सध्या दंड या प्रकारे वसूल केला जातो, आणि कर्जाच्या मुळ रकमेसोबत जोडला जातो. यामुळे तो नेमका किती आकारला गेला ते समजत नाही.

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like