khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

 

औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी केलेल्या विधानानंतर या चर्चेला वेग आला. बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार केदार यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल असे काही बोलले, की सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि काँग्रेसमध्ये अशोक पर्व सुरु होणार या चर्चेला सुरुवात झाली.

बबनराव तायवाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास अशोक चव्हाण, अभिजीत वंजारी, सुधाकर अडाबळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते.

Babanrao Taywade birthday function

सुनील केदार म्हणाले तरी काय ?

केदार म्हणाले, “अशोक चव्हाण मोठ्या मनाचा माणूस आहे. ते आमचा आधारस्तंभ आहेत. आम्ही त्यांना मोठ्या श्रद्धेने पाहत आलो आहोत आणि पाहत राहू. ते कितीही नाही बोलले तरी आम्ही जबरदस्ती करू” केदार यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.

लोक आपसात विचारू लागले आहेत की, सुनील केदार चव्हाणांना कोणती नवी जबाबदारी देणार आहेत? पटोलेंच्या जागी चव्हाणांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बनवायचे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

थोरात यांचे समर्थन

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर केदार यांनी त्यांना पाठिंबा दिला. यासोबतच पटोले यांचेही नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. केदार म्हणाले होते, “तुम्ही कितीही मोठे झालात, आभाळ गाठलंत, तरी पण थोरात साहेबांचा आदर जरूर करा.” राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडीचे सरकार गेले, तेव्हापासून काँग्रेसमधील एका गटाने पटोले यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

चर्चा काही पहिल्यांदाच नाही

अशोक चव्हाण यांना अध्यक्ष करण्याच्या चर्चेची पहिलीच वेळ नाही. नुकतेच चव्हाणांच्या नाराजीचे वृत्त समोर आले होते, त्यानंतरही पटोले यांच्याऐवजी चव्हाण यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष केले जाऊ शकते, अशी चर्चा जोर धरत होती.  मात्र, भारत जोडो यात्रेनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. परंतु, सुनील केदार यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत ज्या पद्धतीने विधान केले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा बाजार गरम झाला आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like