khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

अच्छे दिन…

अच्छे दिन…

अच्छे दिन, अच्छे दिन असं काही बरं असतं का
पोटात खड्डा अन् पाण्यात चंद्र कधी काही लाभतो का l

दुभंगलेली मने,अन द्वेषाची ही धार प्रसवते क्षणोक्षणी
त्या वैरी मनामधे अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

वाचाळ-वीर जोरात, अन् लाऊडस्पिकर गल्लोगल्ली
त्या भोंग्यामध्ये तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

सगळ्यांचीच बोटे दगडाखाली, अन् त्याला फासिला शेंदूर
त्या नवसामध्ये तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

मतांची दुकानदारी अन्, लोकशाहीच हरण करे हुकूमशाही
या बहुमातमधे तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

असे वाट प्रत्येक हाताला कामाची, पण ठेविला धोंडा तिथे
त्या बेकारीमध्ये तरी अच्छे दिन, असं काही बरं असतं का l

झाले गहाळ दीन इथे अन, वाट बघे त्या झाडावरची दोरी
त्या शेवटामध्ये तरी अच्छे दिन,असं काही बरं असतं का l

अच्छे दिन, अच्छे दिन असं काही बरं असतं का ??
पोटात खड्डा अन् पाण्यात चंद्र, कधी काही लाभतो का ??

– निशीकांत तायडे

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like