khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Chat GPT : बेरोजगारी वृद्धीचे नवे तंत्र

अलीकडेच मी LinkedIn या वेबसाईटवर chat GPT संदर्भातील व्हिडिओ पाहिला तेव्हा कुतूहल वाटले. परंतु हे नवे तंत्रज्ञान बेरोजगारीत अधिक भर घालणारे एक हत्यार ठरू शकते, याची चिंता बळावत होती. येत्या काही महिन्यात त्याचा वापर अधिक वेगाने सुरु होईल तसे त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. तथापि, या नव्या तंत्राशी जुळवून घेत आपणा सर्वांना पुढे जायचे आहे, हे मात्र नक्की. कारण लेखन, संपादन, कृषी, क्रीडा यासह दैनंदिन जीवनाचा भाग असणाऱ्या प्रत्येक घटकाला chat GPT चा स्पर्श आपणास जाणवत राहणार आहे.

चॅट जीपीटी हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांत अनेक वेळा ऐकला असेल. तेव्हा हा शब्द AI शी संबंधित असल्याचे समजले असेल. चॅट हे जीपीटी भाषेवर आधारित मॉडेल आहे. यावर काहीही विचारल्यास ते तुमच्याशी अगदी माणसासारखे बोलेल, त्याच्याशी बोलून तुम्हाला असे वाटेल की तुम्ही रोबोट नाही तर माणसाशी बोलत आहात. हे मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे.

GPT हे AI चॅट बॉट प्रमाणे आहे. याला ऑनलाइन कस्टमर केअरसाठी बनवण्यात आले, ते आधीच अशा प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे की यात एकावेळी अनेक भाषा समजण्याची प्रक्रिया समजली जाऊ शकते.

या चॅटबॉटला जे माहीत आहे त्याचे स्त्रोत म्हणजे पाठ्यपुस्तके, वेबसाइट्स आणि बरेच लेख. हे मॉडेल या माहितीच्या आधारावर उत्तर देण्यास सक्षम आहे.

असा करा chat GPT चा वापर …

ब्राउझरमध्ये लॉगिन पेजवर जा.

एआय अकाउंट तयार करा आणि साइन अप करा.

व्हेरिफिकेशनसाठी नंबर विचारला जाईल.

मोबाईलवर कोड येईल. एसएमएसवर शुल्क आकारले जाऊ शकते.

SMS active वर जा. नोंदणी करा आणि लॉग इन करा.

वरील बाजूस उजवीकडे असलेल्या रिचार्जच्या पर्यायावर जा.

रिचार्ज करा आणि सर्च बॉक्समध्ये AI सर्व्हिस शोधा.

शॉपिंग कार्ट बटण दाबा. तिथे तुमच्या मोबाईल नंबरचा नेशन कोड असेल.

तो मोबाईल नंबर कॉपी करा आणि चॅट GPT मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन सेक्शनमधे एंटर करा.

तुम्हाला एक कोड मिळेल जो तुमचा व्हेरिफिकेशन कोड असेल. ओपन एआय बॉक्समध्ये हा कोड एंटर करा.

आता तुम्ही रेजिस्ट्रेशन का केलं याचे कारण निवडा.

चॅट GPT ची वैशिष्ट्ये ….

सगळ्यात महत्वाचे फिचर म्हणजे मानवास रिस्पाँड करणे. त्यामुळे हे चॅटबॉट्स, AI सिस्टिम कन्वरसेशन आणि virtual असिस्टंटसाठी सर्वोत्तम आहे. GPT हे अगदी मनुष्यासोबत संभाषण करत असल्याप्रमाणेच भाष्य करते. विशेष म्हणजे मानवास रिस्पाँड करणे, स्टोरीज लिहीणे. कविता लिहीणे, कोड लिहीणे, लेख लिहीणे, भाषांतर करणे इत्यादी कामे या माध्यमातून करता येतात.

– श्रीपाद सबनीस (Editor, khabarbat.com)
Call : 9960542605
तुमच्या उपयोगाची बातमी, वाचा khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »