भुवनेश्वर : जर्मनी हाॅकी संघाने तिसऱ्यांदा विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. जर्मनीने अंतिम सामन्यात दाेन वेळच्या उपविजेत्या बेल्जियमचा पराभव केला. जर्मनी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ ने फायनल जिंकली. त्यामुळे बेल्जियम संघ राैप्यपदकाचा मानकरी ठरला.

कर्णधार थियरे ब्रिंकमॅनने आपल्या कुशल नेतृत्वात हाॅलंड संघाला विश्वचषक हाॅकी स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले. दाेन वेळच्या उपविजेत्या हाॅलंड हाॅकी संघाने कलिंगा स्टेडियमवर जगातील नंबर वन असलेल्या ऑस्ट्रेेलियाच्या टीमला धूळ चारली. हाॅलंड संघाने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला.
दरम्यान, एशियन गेम्स यंदा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टाेबरदरम्यान चीनमध्ये हाेण्याची शक्यता आहे. याच स्पर्धेतून हाॅकी संघांना ऑलिम्पिक काेटा मिळवण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सर्वाेत्तम कामगिरीतून हाॅकी संघ २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतील, अशी माहिती हाॅकी महासंघाचे अध्यक्ष इकराम तय्यब यांनी दिली.