khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

भारतीय महिलांनी इंग्लंडला लोळवले; T-20 विश्वचषक पटकावला

सेनवेस पार्क : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२३ (womens T-20 world cup) स्पर्धेचा अंतिम सामना सेनवेस पार्क येथे खेळला गेला. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले.

कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिल्या-वहिल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूने इंग्लंडने ठेवलेल्या ६९ धावांचा पाठलाग करत भारताची चांगली सुरुवात केली. मात्र १६ धावांवर कर्णधार शफाली वर्माला १५ (११) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ ५ (६) धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात ४६ धावांची भागीदारी केली. मात्र २४ (२९) धावा करून त्रिशा बाद झाली. सौम्याने ३७ चेंडूत २४ धावा करून पहिल्या-वहिल्या अंडर-१९ विश्वचषकात विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर अवघे ६९ धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर त्यांनी लिबर्टी हीपच्या स्वरुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्स हिला देखील भारतीय गोलंदाजीचा सामना करणे अवघड झाले. तिने केवळ ४ धावा केल्या. पहिल्या १० षटकात केवळ ३९ धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. नियाम फिओना हॉलंड १० (८), रायना मॅकडोनाल्ड गे १९ (२४), अलेक्सा स्टोनहाउस ११(२५) आणि सोफिया स्मेल ११(७) वगळता कोणालाही दोनआकडी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि कर्णधार अष्टपैलू शफाली वर्मा यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले.

तुमच्या उपयोगाच्या महत्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा… khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like