khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Love jihad विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते सामील झाले होते. मुंबईतील शिवाजी पार्कवरील मोर्चात भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ सहभागी झाले.

या आहेत मागण्या?

छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा
धर्मांतरबंदी आणि लव्हजिहादविरोधी कायदा करावा.
मुंबईत भूखंड जिहादही सुरू आहे, त्याला रोखावे.
मुंबईत अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्या बांग्लादेशींवर कारवाई करावी.
आरे कॉलनीतील काही जमिनींवर एका समाजाने अवैधरित्या प्रार्थनास्थळ बांधली आहेत, ती हटवावीत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विटद्वारे भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की,”शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षापासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे? करसेवकाच्या हत्या करणाऱ्या मौ. मुलायम यांना पद्मविभूषण, हिंदू आक्रोश करणारच!”. असे ट्विट त्यांनी केले आहे. आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

तुमच्या उपयोगाच्या महत्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा… khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »