सॅनफ्रान्सिस्को : ‘मायक्रोसॉफ्ट’ला जणू आज डुलकी लागली आणि साऱ्या जगभर कल्लोळ माजला. ‘मायक्रोसॉफ्ट’ या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्याने युजर्स वैतागले आहेत. यामध्ये आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरता येत नसल्याने नक्की काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी युजर्स मंडळींनी ट्विटरवर प्रश्नांची सरबत्ती चालवली आहे.
मायक्रोसॉफ्टचा ई-मेल प्लॅटफॉर्म असलेल्या आऊटलूकची सेवा भारतासह इतर काही देशांमध्ये बंद असल्याचे ट्विटरवरील अनेक तक्रारींवरुन सांगितले जात आहे. या सेवा बंद होण्यामागे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचे कारणही सांगितले जात आहे. पण कंपनीकडून अद्याप यावर कुठलंही स्पष्टीकरण न आल्याने युजर्सना मात्र काही कळेनासे झाले आहे. त्यामुळे अनेक युजर्सने थेट मायक्रोसॉफ्टकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.
अशा महत्वाच्या बातमीसाठी वाचा khabarbat.com आणि राहा Update. या बातमीविषयी आपले मत खालील Comment Box मध्ये लिहा.