कोस्टा मेसा (कॅलिफोर्निया) : ॲप्पल वॉच भारतासह जगभरात लोकप्रिय आहे आणि त्यामागचे कारण केवळ डिझाईन आणि त्याचा प्रीमियमच नाही तर त्यात दिलेले हेल्थ आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स युजर्सना खूप आवडतात. त्याची आरोग्य वैशिष्ट्ये इतकी जबरदस्त आहेत की अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत.
ही वैशिष्ट्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकरणांइतकीच अचूक आहेत. यामुळे शरीरातील अनेक बदलांचा सहज मागोवा घेता येतो आणि वेळेत मोठा निर्णय घेता येतो आणि जीवही वाचू शकतो. अलीकडेच जेस्सी केली (jesse kelly) या गरोदर महिलेसोबतही असेच घडले. महिला आणि तिच्या मुलासाठी ही घड्याळ देवदूतच ठरली आहे.
वास्तविक ही गर्भवती महिला ॲप्पल वॉच वापरते. जेसी केली असे या महिलेचे नाव आहे. एक दिवस अचानक या महिलेच्या हृदयाच्या गतीमध्ये असामान्यता दिसली, त्यानंतर ॲप्पल वॉचने या महिलेला याबाबत अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या महिलेने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. खरं तर, या महिलेचे ॲप्पल वॉच तिला तिच्या असामान्य हृदय गतीबद्दल सतत सांगत होते, ज्यामध्ये तिच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला १२० बीट्स पेक्षा जास्त होते.
एवढेच नाही तर त्या महिलेचा रक्तदाब कमी होत होता आणि त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. ऍपल वॉचने या महिलेला योग्य वेळी अलर्ट पाठवून दिलेल्या माहितीमुळे ही महिला आता सुरक्षित असून तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. बाळाचे नाव मेरी ठेवण्यात आले आहे.
अशा महत्वाच्या बातमीसाठी वाचा khabarbat.com आणि राहा Update. या बातमीविषयी आपले मत खालील Comment Box मध्ये लिहा.