khabarbat

Advertisement

Earth inner core : पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले; दिशा बदलणार

नवी दिल्ली : पृथ्वीच्या आतील गाभ्याचे परिभ्रमण अलीकडेच थांबले आहे. तसेच त्याची दिशा देखील उलट झाल्याचे पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. पृथ्वीच्या आतील थरांमधील गतिशीलता आणि परस्पर संबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.

पृथ्वीची उत्पत्ती मुळात कवच, आवरण आणि गाभा या तीन थरांनी झालेली आहे. भूकंपातून येणाऱ्या भूकंपीय लहरींच्या अभ्यासाद्वारे पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या आतील गाभ्याची ओळख सर्वप्रथम १९३६ मध्ये झाली होती. याची रुंदी सुमारे ७,००० किलोमीटर असून ते द्रव स्वरुप लोखंडी कवचाचे बनलेले आहे.

पीकिंग युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, २००९ मध्ये पृथ्वीच्या गाभ्याचे भ्रमण थांबले आहे. तसेच ते दिशा बदलण्याच्या प्रक्रियेत असल्याचे निदर्शनास येत आहे. नेचर जिओसायन्समध्ये याविषयीची माहिती प्रकाशित झाली असून त्यानुसार, गाभ्याच्या परिभ्रमणाचा दिवसाच्या लांबीच्या बदलांवर परिणाम होतो. शिवाय पृथ्वीला त्याच्या अक्षावर फिरण्यास जो वेळ लागतो, त्यातही किरकोळ बदल होऊ शकतात.

संशोधकांच्या मते, या निरीक्षणांमध्ये पृथ्वीच्या थरांमधील गतिशील परस्परक्रियांचे पुरावे दिसून आले आहेत. गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीच्या थराच्या आवरणातून पृष्ठभागावर कोणीय संवेगाचे हस्तांतरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

पीकिंग युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमचा असा अंदाज आहे की, त्यांचे निष्कर्ष पृथ्वीच्या थरांमधील गतिशील परस्परक्रिया आणि ग्रहाच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर कसा परिणाम करू शकतात याबद्दल अतिरिक्त अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. हेच परस्परसंवाद आणि संपूर्ण पृथ्वी समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. मात्र आतील गाभ्याच्या परिभ्रमणातील बदलामुळे पृष्ठभागावर राहणाऱ्यांना नुकसान होईल अशी कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही.

अशा महत्वाच्या बातमीसाठी वाचा khabarbat.com आणि राहा Update. या बातमीविषयी आपले मत खालील Comment Box मध्ये लिहा.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »