khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Gold : सोने खरेदी मुंबई, पुणे पेक्षाही औरंगाबादेत महागली !

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरातील अस्थिरतेने आज ऐन रथसप्तमीच्या तोंडावर चढ्या दराचा फटका दिला. सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे तर चांदीचे दर तूर्त तरी बऱ्यापैकी स्थिर आहेत. मुंबई, पुणे पेक्षाही औरंगाबादमध्ये सोन्याचे दर अधिक असल्याचे जाणवत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटवरील माहितीनुसार २२ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२,३५० रुपये तर २४ कॅरेट साठी ५७,११० रुपये आहे तर आज १० ग्रॅम चांदी ७२३ रूपये आहे.

मुंबई – ५७,११० रुपये

पुणे – ५७,११० रुपये

औरंगाबाद – ५७,४९० रुपये

२२ आणि २४ कॅरेटमध्ये फरक पहा…

२४ कॅरेट सोने ९९.९ % शुद्ध असते आणि २२ कॅरेट अंदाजे ९१ % शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९ % इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक व्यावसायिक २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark) तपासा….

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ऍक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सोन्याची शुद्धता कशी ओळखाल ….

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. २४ कॅरेटवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० लिहीलेले असते.

बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही जण १८ कॅरेट देखील वापरतात. सोने २४ कॅरेट पेक्षा जास्त विकले जाते. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »