khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Politics : अवधूत गुप्ते आता राजकारणात ‘झेंडा’ रोवणार

मुंबई : प्रसिद्ध गायक, संगितकार, दिग्दर्शक, अभिनेता अवधूत गुप्ते आता राजकारणात झेंडा रोवणार आहे. अवधूत आपल्या प्रोफेशनद्वारे राजकीय क्षेत्राच्या कायम जवळ राहिला आहे. त्याला राजकारणात येण्याबाबत विविध राजकीय पक्षांकडून अनेकदा विचारणाही झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रत्यक्ष राजकारणातील प्रवेशावर तो स्पष्टच बोलला.

अवधूतनं आपण राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. राजकारणात येण्याची योग्य वेळ कुठली आहे हे देखील त्यांनं यावेळी सांगितली; तो म्हणाला, “एखादी निवडणूक आली की मला अनेकदा राजकारणात येण्याबाबत विचारणा झाली आहे. पण आता मी खरंच जाहीर करुन टाकतो की मी राजकारणात प्रवेश करणार आहे. पण मी जेव्हा सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होईल तेव्हाच राजकारणात प्रवेश करेन. ज्यावेळी माझा पक्का निर्णय होईल तेव्हा मी राजकारणात येण्याची तारीखही जाहीर करेन”

‘झेंडा’चा येणार सिक्वल

यापूर्वी शिवसेनेच्या फुटीवर अवधूतनं दिग्दर्शित केलेला झेंडा सिनेमाचा पुढचा भाग येईल का? या प्रश्नावरही त्यानं उत्तर दिलं. झेंडा सिनेमात मी शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याची बाजू मांडली होती. पण आता नेत्यांची आगतिकता दाखवेन, याच्या स्क्रिप्टवर माझं काम सुरु आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like