khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

shakuntalam : समंथाच्या शकुंतलेची भुरळ …

मुंबई I यशोदा नंतर, समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा पडद्यावर तिच्या नवीन लुकसह चाहत्यांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या ‘शाकुंतलम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘शाकुंतलम’ या पौराणिक चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली होती. त्यानंतर आता तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे.

समंथा रुथ प्रभूचा हा तेलगू चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. हिंदीत नुकताच प्रदर्शित झालेल्या या छोट्या ट्रेलरने चाहत्यांची आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित केली आहे.

अवघे २ मिनिट ५२ सेकंदाचा हिंदी ट्रेलर अप्रतिम आहे. ट्रेलरची सुरुवात छोट्या शकुंतलाच्या जन्मापासून होते, जिला तिचा जन्म होताच तिच्या पालकांनी सोडून दिले होते. तिचा जन्म ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गातील अप्सरा मेनका यांच्या प्रेमसंबंधातून झाला. शकुंतला अनाथ दिसल्यावर ऋषी कण्व तिची काळजी घेतात.

एके दिवशी राजा दुष्यंत त्याच्या साथीदारांपासून विभक्त होऊन जंगलात जातो आणि तिथे त्याला शकुंतला दिसते आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होतात. त्यानंतर दोघेही जंगलातच लग्न करतात. त्यांचे प्रेम बहरत जाते आणि राजा दुष्यंत शकुंतलेला वचन देतो की तो नक्कीच परत येईल. दरम्यान, शकुंतलेलाही तिची आई ज्या प्रसंगातून गेली होती अशाच प्रसंगातून तिला जावे लागले हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

एकीकडे शकुंतलाच्या व्यक्तिरेखेत समंथा एकदम परफेक्ट दिसते. तर दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची ६ वर्षांची लाडकी मुलगी अल्लू आरहा देखील ट्रेलरमध्ये दिसली आहे, तिच्या निरागसतेमुळे चाहते तिचे कौतुक करत आहेत.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »