khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

पंढरपूर I ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल… OK मध्ये हाय…’ या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे Fire brand नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खरं तर शहाजी बापू म्हणजे नादखुळा माणूस. त्यांनी चक्क आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत होते, अशी माहिती हाती आली आहे.

शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात २४ डिसेंबर रोजी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.

बंगळूरू येथील आश्रमात २४ डिसेंबरपासून बापूंचा हा आयुर्वेदिक कार्यक्रम सुरु झाला होता. पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायची, यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारणा करायचे.

वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी मेडिटेशन. असा त्यांचा दिनक्रम होता. यामुळे त्यांचे वजन आश्चर्यकारकरित्या घटले, अशी माहिती शहाजी बापू पाटील यांनी दिली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like