khabarbat

Advertisement

LPG : गॅस सिलिंडर भडकला; हॉटेलिंग महागणार

नवी दिल्ली : आजपासून नवीन वर्ष २०२३ सुरू झाले, पण वर्षारंभ दिनी LPG गॅसचे दर सरकारी कंपन्यांनी वाढवले आहेत. यामुळे नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला. सरकारी तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२३ रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.

विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात २५ रुपयांपर्यंत वाढ झाली. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडर जुन्या दरात उपलब्ध आहेत. राजधानी दिल्लीत आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत गृहिणींचे बजेट बिघडणार नसले, तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »