औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या फूड कोर्टवर अस्सल मराठवाडी धपाटे, नागपुरी पापड, नाशिकचे ड्रायफ्रूट, चटपटी भेळ, पाणी पुरी, मटका पिझ्झा, फायर अशा अनेक स्वादिष्ट खाद्याचा मराठवाड्यातील खवय्यांनी आस्वाद लुटला, निम्मित होते रेड एफ एम-प्रोझोन फूड फेस्टिवलचे.
येत्या ४ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत, फूड कोर्ट प्रोझोनमॉल (Prozon Mall) येथे हा महोत्सव सुरु आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते या फूड फेस्टिव्हलचे उदघाटन झाले, या प्रसंगी प्रोझोन मॉलचे मॅनॅजिंग डायरेक्टर निखिल चतुर्वेदी, प्रेसिडेंट & सीइओ बिपीन गुरनानी, सेंटर डायरेक्टर कमल सोनी, रेड एफएमचे प्रोग्रामिंग हेड अमोल देवाळे, आरजे अर्चना, आरजे रोहन यांसह संपूर्ण रेड एफ एम आणि प्रोझोन मॉल टीम उपस्थित होती.
मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या ३० हुन अधिक फूडस्टॉलचा या फेस्टिव्हलमध्ये सहभाग आहे, ज्याला पहिल्या तीन दिवसातच औरंगाबाद शहरातील लाखांहून अधिक खवय्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आहे. खाद्य पदार्थांसोबतच १० दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये नागरिकांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जादूगर ए लाल यांचे जादूचे प्रयोग, अँकर प्रांजल यांचे बहारदार निवेदन आणि गायन तसेच विविध मनोरंजक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन या दरम्यान होत आहे.
फूड फेस्टिव्हलमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांसाठी विशेष लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळेल, मराठवाड्यातील या सर्वात मोठ्या “विंटर फूड फेस्टिव्हल”मध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रोझोन मॉल आणि ९३.५ रेड एफ एम यांनी सर्व औरंगाबादकराना केले आहे .