khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

sixer king ऋतुराज… १ ओव्हर, ७ सिक्सर!

मुंबई : महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी – २०२२ च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध अनोखा विक्रम नोंदवत तो सिक्सरकिंग ठरला. ऋतुराजच्या अगोदर जेम्स फुलरच्या नावावर हा विक्रम होता. ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ३८ धावा केल्या. ऋतुराज (Ruturaj) ने १५९ चेंडूत २२० धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यात त्याने १० चौकार आणि १६ षटकार फटकावले. एवढेच नव्हे, तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आणखी एक विक्रम केला. त्याने उत्तर प्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला गारद केले. शिवाच्या एका षटकात ७ सिक्सर ठोकले.

विजय हजारे करंडकच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळवला गेला. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण ४९ व्या षटकामध्ये त्याने केलेला कारनामा जागतिक विक्रम बनला. ४९ वे षटक घेऊन आलेल्या उत्तर प्रदेशचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगची चांगलीच धुलाई केली.

ऋतुराजने प्रत्येक चेंडूवर सिक्सर नोंदवला. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगने ‘नो बॉल’ टाकला. त्यावरही ऋतुराजने सिक्सर फटकावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह ४३ धावा वसूल केल्या. List A क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला.

या विक्रमी कामगिरीसह ऋतुराजने या इनिंगमध्ये द्विशतकही साजरे केले. त्याने १५९ बॉल्समध्ये १० चौकार आणि तब्बल १६ षटकारासह २२० धावा ठोकल्या.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like