khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Yerwada : कैद्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकित पोलीस जखमी

पुणे : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली. पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

येरवडा कारागृहातील जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले आणि या दोन्ही गटांनी परस्परांवर तुफान दगडफेक केली. इतकेच नव्हे तर दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न कारागृह पोलिस हवालदाराने केला तर त्या हवालदारालाही कैद्यांच्या जमावाने बेदम मारहाण केली.

ही धक्कादायक घटना येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बराक नंबर २७ ते ३१ या बराकीजवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »