khabarbat

khabarbat logo

Join Us

NCP Leader Ajit Pawar

Advertisement

अजितदादा Not Reachable; राष्ट्रवादीच्या पोटात गोळा !

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान गेल्या पाच दिवसांपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे.

शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरालाही अजित पवार गैरहजर होते. ४ नोव्हेंबरला शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरातून अजित पवार आजोळी गेले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत होते. मात्र अजितदादा आपल्या आजोळी म्हणजे देवळाली प्रवरा येथे पोहोचलेच नाहीत. तेव्हापासून अजितदादा गेले कुठे? असा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून अजितदादा ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही शिर्डीत अजित पवार हजर नव्हते. या शिबिरात पहिल्या दिवशी अजित पवार यांचे जवळपास दीड तास भाषण झाले. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून थेट शिबिराला हजेरी लावली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलेच उधाण आले.

मनसे नेत्याचा गौप्यस्फोट – या सर्व चर्चांदरम्यान मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, ‘मिटकरी राजसाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्या अगोदर अजितदादा हे पवारसाहेबांवर नाराज होऊन काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? याचा खुलासा करावा..अजितदादांनी कंपू बदलला तर पळता भुई थोडी होईल तुमची.’

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »