मुंबई : झारखंडमधील रामगढ येथे राहणाऱ्या एका महिलेने १० ऑक्टोबरला एका मुलीस जन्म दिला. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्या पोटात दुखू लागले. रामगढ रुग्णालयात तिचे सीटी स्कॅन केले तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी या मुलीच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर नव्हे, तर भ्रूण असल्याचे दिसले. तब्बल ८ भ्रूण तिच्या पोटात आढळले. डॉक्टरांनी ऑपरेशन करून मुलीच्या पोटातील अविकसित भ्रूण काढले आहेत. या मुलीची शस्त्रक्रिया डॉ. इम्रान यांनी केली. त्यांनी सांगितले की, जगातील ५ ते १० लाख मुलांमध्ये असे एखादे प्रकरण आढळते. आतापर्यंत जगात अशी २०० प्रकरणे आहेत. भारतातील हे पहिले प्रकरण आहे. कारण याआधी लहान मुलांच्या पोटातून एक किंवा दोन भ्रूण काढण्यात आले; पण ८ भ्रूण हे धक्कादायक आहे.
नवजात बाळांच्या पोटात भ्रूण असण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. पण एकाच बाळाच्या पोटातून इतक्या प्रमाणत भ्रूण निघणे हे देशातीलच नव्हे तर जगातील असे हे पहिलेच प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. मुलीला एका आठवड्यानंतर डिस्चार्ज दिला जाणार आहे. .
रांची स्थित राणी चिल्ड्रेन रुग्णालयाचे प्रमुख राजेश सिंहचे म्हणणे आहे की, ‘सदर प्रकरण विचित्र असल्यामुळे हा प्रकार एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची तयारी सुरू आहे. ‘जर्नल ऑफ नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन’च्या नुसार या स्थितीला ‘फीट्स इन फेटू’ म्हटले जाते. डॉ. इम्रान यांच्या म्हणण्यानुसार ‘एफआईएफ’च्या प्रकरणामध्ये आठ भ्रूण आढळण्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. असे हे विचित्र प्रकरण १० लाख मुलांमधून एखाद्याच्या बाबतीत घडते.