Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण
होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या…