आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जालन्याची मनस्वी दांडगे सर्वप्रथम
जालना : पुणे येथे नुकतेच १३ वी नॅशनल आणि सहावी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यामधील स्मार्ट किडच्या शाखेतील ३,५०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून जालन्याच्या मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीने B2 कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक पटकवला आहे. यानिमित्त तिचा स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या मुख्य संचालिका सौ. प्राजक्ता संजय कळमकर यांनी…