
Hydrogen Gas | गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे, तर हायड्रोजनवर चालणार!
khabarbat News Network नवी दिल्ली | प्रदूषणविरहित व स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाणा-या हायड्रोजन वायूचा वाहनांमध्ये जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक योजना तयार करत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार