
Climate Change : महाराष्ट्राचे हवामान बिघडले; देशात सर्वाधिक १९४ बळी
नवी दिल्ली I महाराष्ट्राचे हवामान बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात १९४ लोकांचा मृत्यू झाला. विशेषतः धूळ, अतिवृष्टी यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. देशात खराब हवामानामुळे बिहारपाठोपाठ आसाम, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली. २०२२ मध्ये हवामानाच्या आक्राळ-विक्राळ रुपात सापडल्याने देशातील २ हजार २२७ लोकांचा मृत्यू झाला.