
तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही : शरद पवार
पुणे : प्रतिनिधी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानाने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी केली. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. सिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताने सिमला कराराचे पालन करावे आणि तिस-या देशांचा हस्तक्षेप टाळावा. १९७२