Income Tax | कर्मचा-यांकडून बनावट बिलाद्वारे १,०७० कोटींची करचोरी!
नवी दिल्ली : khabarbat News Network आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणा-या कर्मचा-यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणा-या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे. सुमारे ९० हजार पगारदार कर्मचा-यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,०७० कोटी रुपये मिळवले…