Bangladesh Protest | मुजीबुर्रहमान यांचे घर जाळले; बांगलादेशात आगडोंब उसळला
ढाक्का : News Network बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अवामी लीगच्या आज ६ फेब्रुवारीला होणा-या देशव्यापी विरोध प्रदर्शनाच्याआधी राजधानी ढाकासह बांग्लादेशच्या अनेक शहरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. आंदोलकांनी ढाकाच्या धानमंडी भागातील शेख मुजीबुर्रहमान यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोर बुलडोझर घेऊन आले होते. त्यांनी शेख मुजीबुर्रहमान यांचे घर पेटवून दिले. हजारोंच्या संख्येने अवामी लीगचे समर्थक,…