प्रयागराज : khabarbat News Network
सतत हल्ले करणा-या कुत्र्याला सीरियल ऑफेंडर ठरवून जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. प्रयागराजमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एबीसी अर्थात अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरसाठी हा आदेश लागू झाला आहे. हिंसक श्वानांना नियंत्रणात ठेवून लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे.

जर एखादा कुत्रा पहिल्यांदा कुणाला चावला, तर त्याला १० दिवसांसाठी एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. त्यासाठी ज्या व्यक्तीला कुत्रा चावला, त्याला उपचार घेतल्याचे प्रमाणपत्र आधी द्यावे लागणार, नंतर संबंधित कुत्र्याला पकडून एसीबीमध्ये ठेवले जाणार आहे. एबीसीमध्ये त्या कुत्र्यावर नजर ठेवली जाणार. त्यानंतर त्याला मायक्रो चिप लावून सोडले जाणार आणि त्याचे वर्तन कसे आहे, कुठे फिरतोय हे बघितले जाणार आहे. जर व्यक्तीची चुकी नसताना तो कुत्रा चावला तर त्याला चावणारा ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे.