भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरी मिळवू इच्छिणा-या तरुणांसाठी एलआयसीने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता या एकूण ८४१ पदांसाठी भरती प्रक्रिया २०२५ ची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसीच्या (LIC) अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

हे पण वाचा…. कर्मचा-यांसाठी गुडन्यूज! ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार?
ही भरती मोहीम संस्थेतील ८४१ रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली असून, ती ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या भरतीसंबंधी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.
पदांचा तपशील ……..
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ८४१ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये
सहाय्यक अभियंता : ८१ पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी : ४१० पदे
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी : ३५० पदे