Banking Recruitment | सरकारी बँकेतील नोक-या ही नेहमीच तरुणांची पहिली पसंती राहिली आहे. जर तुम्हीही बँकिंग क्षेत्रात तुमचे करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत असाल तर सध्या आयबीपीएस, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या बँकांमध्ये १७,००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक पदांसाठी सर्वाधिक पदांची संख्या जाहीर केली आहे. देशभरातील बँकांमध्ये लिपिक पदांसाठी १०,२७७ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाले आहेत आणि २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहतील.
STATE BANK OF INDIA
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील लिपिक पदासाठी ६,५८९ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत करता येतील. Link : https://khabarbat.com/2025/08/06/sbi-clerk-recruitment-now-start/
BANK OF BARODA
बँक ऑफ बडोदाने (BOB) मॅनेजर सेल्स, ऑफिसर ऍग्रीकल्चर सेल्स आणि मॅनेजर ऍग्रीकल्चर सेल्स या ४१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येतील आणि यासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात पदवी आणि सेल्सचा अनुभव असावा. Link : https://khabarbat.com/2025/08/08/jobs-in-bank-of-baroda/
UNION BANK OF INDIA
युनियन बँक ऑफ इंडियाने (UBI) वेल्थ मॅनेजरच्या २५० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येतील आणि संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. Link : https://khabarbat.com/2025/08/08/union-bank-of-india-recruitment/
देशभरातील बँकांमध्ये लिपिक पदांसाठी १०,२७७ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहतील.