संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रतिनिधी
प्रसिद्ध ऑटो कंपनी बजाज ऑटोला मोठा धक्का बसू शकतो. कंपनीचे MD राजीव बजाज यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारली नाही, तर कंपनीला ऑगस्ट २०२५ पासून त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन थांबवावे लागू शकते.

Bajaj सध्या त्यांचे चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आणि अलीकडेच लॉन्च झालेल्या गो ई-रिक्षाचे उत्पादन करत आहे. परंतु आता चीनमधून हे दुर्मिळ (earth magnet) अर्थ मॅग्नेटचा पुरवठा थांबत आहे, ज्यामुळे ईव्ही मोटर्स बनवण्यासाठी अडचणी येऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, जर सध्याचा साठा लवकरच संपला आणि पर्यायी पुरवठा झाला नाही, तर ऑगस्ट २०२५ कंपनीसाठी ‘शून्य उत्पादन महिना’ ठरू शकतो.
राजीव बजाज यांनी या कठीण परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) मध्ये वापरल्या जाणाऱ्या सुमारे ९०% मॅग्नेट चीनमधून येतात. चीनच्या नवीन निर्यात धोरणामुळे केवळ बजाजच नाही, तर इतर अनेक भारतीय ऑटो कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.
Bajaj प्रमाणेच, TVS आणि एथर एनर्जी सारख्या इतर इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनाही याच समस्येचा सामना करावा लागत आहे. पुरवठ्याच्या समस्यांमुळे या कंपन्या हळूहळू त्यांचे उत्पादन कमी करत आहेत.