आपल्या शरीराला जसे आपण गुरूत्वीय बळाच्या सहाय्याने Move करतो नेमके तसेच ग्रह, तारे आणि नक्षत्रांची देखील movement (अर्थात स्थानांतर) होत असते. कधी थेट सरळ तर कधी मागोवा घेवून पुन्हा सरळ चाल पडते. जसे आपण रस्त्याने चालताना करतो अगदी तसेच! या वळून मागोवा घेण्यालाच (वळण्याला) वक्री होणे म्हटले जाते.
सध्या १३ जुलै २०२५ रोजी शनी ग्रह वक्री होण्याची चर्चा बऱ्यापैकी होत आहे. शनी हा काही पहिल्यांदा वक्री होत आहे का? तर असे मुळीच नाही. दर वर्षी मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे ५ ग्रह वक्री होत असतात.
सूर्य, चंद्र कधीच वक्री होत नसतात. राहू, केतू नेहमीच वक्री असतात. मात्र मंगळ ७५ दिवस, बुध २२ दिवस, गुरु १२० दिवस, शुक्र ४२ दिवस व शनी १३९ दिवस हे ग्रह वक्र स्थितीत असतात.
वक्री होणे म्हणजे उलट किंबहुना मागील दिशेने फिरणे, पण याचा अर्थ असा नाही की संबंधित ग्रह नेहमी मागच्या राशीतच जाईल. शनि जेव्हा वक्री होतो, तेव्हा तो त्याच राशीत देखील मागे फिरतो, पण त्याची आकाशस्थ स्थिती मागे असल्यासारखी दिसते मात्र राशी बदल होत नाही. वक्री होणे म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ग्रहाची गती मंदावणे अर्थातच तो काहीसा थांबल्यासारखा दिसतो आणि नंतर मागील दिशेने फिरतो (चालू लागतो).
उदा. सध्या शनी मीन राशीत आहे येत्या १३ जुलैला वक्री होत आहे म्हणजे शनी (सुर्याच्या कक्षेत जाण्याऐवजी) मंगळाच्या कक्षेतच राहील.
आता प्रश्न पडतो शनी शुभ की अशुभ. ते अष्टक वर्गातून समजू शकते. शुभ बिंदू दिसत नसेल तर महत्वाची कामे शक्य असतील तर काही दिवस लांबणीवर टाकावीत.
|| शुभं भवतु ||
– श्रीपाद सबनीस
संपर्क : 9960542605