तेहरान : News Network
Lady Killer | इराण आणि इस्रायलमधील युद्धात, मोसादच्या महिला एजंट्सने इराणी अणुशास्त्रज्ञांवर हनीट्रॅपचा वापर करून जीवघेणे हल्ले केले. कॅथरीन पेरेज नावाच्या एका एजंटने, इस्लाम स्वीकारून स्थानिक समुदायात मिसळून, ९ शास्त्रज्ञांना ठार मारले. तिने इराणी अधिका-यांच्या पत्नींमार्फत संपर्क साधून टार्गेटवर हल्ले केले. मोसादच्या महिला एजंट पुरुषांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते.


मोसादमध्ये अत्यंत सुंदर ललना आहेत. हातात हायटेक शस्त्रे आणि समोरच्यांना घायाळ करणारी अदा या बळावर त्या शिकार करतात. मोसादचं हनीट्रॅपचं जाळं अत्यंत सशक्त असल्यामुळेच मशन अत्यंत कुशलतेने पार पडतं. विशेष म्हणजे मोसादच्या या लेडी एजंट्स शत्रूंना दिसत नाहीत आणि जगासमोरही येत नाहीत. त्या काळजात घुसून जीव घेतात. गरज पडल्यास रक्तही शोषून घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. मोसादनेही या महिलांना तशा पद्धतीनेच तयार केलेलं असतं. म्हणजे गरज पडल्यास हनीट्रॅप करणं, शरीर दाखवून टार्गेटला जाळ्यात ओढणं आणि विषय फारच पुढे गेला तर ऑन दी स्पॉट मर्डर करणं, या सर्व गोष्टी या महिलांना शिकवल्या जातात.
९ शास्त्रज्ञांना जीवे मारल्यानंतर कॅथरीन पेरेज कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही. ती फ्रान्सची नागरिक होती, एवढीच माहिती आहे. मोसादने तिला इराणमध्ये खास ऑपरेशनसाठी प्रशिक्षित केलं होतं. ऑपरेशन पार पाडण्यासाठी कॅथरीन इराणला गेली. तिथे तिने इस्लाम कबुल केला. त्यानंतर एका वर्षाच्या आत ती सीनिअर ऑफिशियल्सच्या घरापर्यंत पोहोचली.
इराणच्या गुप्तचर विभागाने आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, मोसादची एजंट कॅथरीन स्थानिक शिया समुदायात ती इतकी मिसळली की कुणाला तिच्याबद्दलचा संशयच आला नाही. त्यानंतर ती सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियरांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. कुटुंबाशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीनने इराणी अधिका-यांच्या बायकांचा सहारा घेतला.