इस्तंबूल : News Network
इस्राईलच्या आर्यन डोम संरक्षण प्रणालीच्या इराणने चिंधड्या उडवत अनेक इमारती उद्धवस्त केल्या. इस्राईलने गाझापट्टीतील युद्ध अजूनही न थांबवता आता इराण बरोबर वैर पत्करले आहे. मध्य पूर्वेला अशांत करुन इस्राईल आता मुस्लीम समुदायाच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे इस्लामिक सहयोग (IOC) संघटनेच्या ५७ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री शनिवारी तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये एकत्र आले आहेत.

या बैठकीत इस्राईलच्या विरोधात मतदान होणार आहे. या बैठकीत इराणचे परराष्ट्र मंत्री देखील सामील होत आहेत. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान स्वत: उद्घाटनाचे भाषण देतील. आणि परराष्ट्र मंत्री हाकान फिदान अध्यक्षपद भूषवणार आहेत.
तुर्कीने आधीच स्पष्ट केले आहे की, त्यांची प्राथमिकता पॅलेस्टाईनचा मुद्दा असणार आहेत. हाकान फिदान यांनी यास क्षेत्रीय अस्थितरतेचे मूळ असे म्हणत ‘टू स्टेट’ पर्यायावर चर्चा व्हावी असे म्हटले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची देखील या बैठकीत भाग घेत आहेत. या बैठकीत एक विशेष सत्र इस्राईलने इराणच्या न्युक्लीअर साईटवर केलेला हल्ला यावर असणार आहे. यात लेबनॉन, सिरीया, येमेनपर्यंत पसरलेल्या इस्राईली लष्करी मोहीमेच्या संदर्भात इशारा दिला जाणार आहे.
मलेशियाचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हसन यांनी स्पष्ट केले आहे की, ते IOC मध्ये मुस्लिम एकतेबद्दल बोलतील. इस्लामोफोबिया, धार्मिक द्वेष आणि पॅलेस्टाईनचा स्वयंनिर्णयाचा अधिकार यासारख्या मुद्द्यांवर मलेशियाची स्पष्ट भूमिका या बैठकीत ते मांडणार आहेत.
इस्राईलविरुद्ध प्रस्ताव आणला जाणार ?
मुस्लिम देशांत असंतोष शिगेला पोहोचला असताना ओआयसीची ही ५१ वी बैठक होत आहे. जेव्हा असा अंदाज लावला जात आहे की, ओआयसी इस्रायलविरुद्ध एक मजबूत संयुक्त प्रस्ताव आणू शकते, ज्यामुळे राजकीय दबाव वाढेल. परंतु, ५७ देशांचे यावर एकमत होते की नाही हे पाहणे महत्वाचे असणार आहे.