लंडन : News Network
ब्रिटन आणि इस्रायलच्या संशोधकांनी तब्बल २० वर्षे घालवत एका नव्या रक्तगटाचा शोध लावला आहे. १९७२ मध्ये हा रक्तगट सापडला होता. संशोधक एका महिलेच्या रक्तात सापडलेली कमतरता शोधत होते. आता त्यांचा शोध प्रकाशित झाला असून यामुळे अशाप्रकारच्या दुर्मिळ रक्त गटाच्या लोकांवर चांगला उपचार करता येणे शक्य होणार आहे.

या महिलेच्या रक्तात सापडलेल्या विशेषतेवर जवळपास २० वर्षे संशोधन करण्यात आले. आपल्या रक्तात अनेक प्रकारचे रक्तगट असतात, त्यापैकी अेबीओ आणि आरएच हे मुख्य घटक असतात. हे रक्तगट रक्तपेशींमध्ये आढळणा-या प्रथिने आणि साखरेपासून बनलेले असतात. आपले शरीर रोग ओळखण्यासाठी त्यांचा वापर करते.
मागील संशोधनांमध्ये ९९.९% पेक्षा जास्त लोकांमध्ये एएनडब्ल्यूजे अँटीजेन आहे, असे आढळले होते. परंतू १९७२ च्या रुग्णाच्या रक्तात ते नव्हते. हे अँटिजेन मायलिन आणि लिम्फोसाईट प्रथिनांवर आढळते. यामुळे संशोधकांनी या नव्या रक्तगटाला एमएएल असे नाव दिले. या रुग्णांमध्ये एएनडब्ल्यूजे निगेटिव्ह असते. टील यांना असे तीन रुग्ण सापडले होते.
एमएल हे काही गुणधर्मांसह एक अतिशय लहान प्रथिन आहे. यामुळे ते ओळखणे कठीण आहे. रक्तगट प्रणाली स्थापित करण्यासाठी आवश्यक पुरावे हवे होते, यासाठी आम्हाला एवढा वेळ लागला, असे इंग्लंडच्या वेस्ट विद्यापीठातील पेशी जीवशास्त्रज्ञ टिम सेटचेवेल यांनी सांगितले. नवजात मुलांमध्ये एएनडब्ल्यूजे अँटीजेन नसते, परंतू जन्मताच ते निर्माण होते. यावर अजुनही शोध सुरु राहणार आहे.