khabarbat

Microsoft is now shutting down one of its most popular apps. This app has been in service for the last 22 years. This app is the video chatting platform Skype. Now they are going to shut down this app.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Goodbye Skype | ‘स्काईप’ २२ वर्षानंतर बंद होणार; मायक्रोसॉफ्ट ‘टीम्स’ घेऊन येणार

सॅनफ्रान्सिस्को : Tech News Network
Microsoft आता त्यांचे बहुचर्चित असलेले एक अ‍ॅप बंद करत आहे. हे अ‍ॅप गेल्या २२ वर्षापासून आपल्या सेवेत आहे. हा अ‍ॅप म्हणजे व्हिडीओ चॅटिंग प्लॅटफॉर्म Skype आता ते बंद करणार आहेत. विंडोजसाठीच्या नवीनतम Skype च्या preview मध्ये काही पॅच नोट्स दिसल्या आहेत, यावरुन हा अंदाज लावला जात आहे. ही सेवा मे २०२५ मध्ये बंद होऊ शकते. आजही या प्लॅटफॉर्मवर लाखो वापरकर्ते आहेत.

Skype बंद केल्यानंतर, कंपनी आपल्या वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट Teams मध्ये मायग्रेट केले जाणार आहे. याचा अर्थ स्काईपच्या जागी ‘टीम्स’ येत आहे.

स्काईपचे ग्राहक व्हर्जन अजूनही उपलब्ध आहे. आजही या प्लॅटफॉर्मवर २ कोटी वापरकर्ते आहेत. कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये चार डेव्हलपर्सनी स्काईप लाँच केले होते. हा एक Audio Calling प्लॅटफॉर्म होता जो परवडणा-या दरात सेवा देत होता.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून स्काईप उपलब्ध राहणार नाही. तुम्ही टीम्सवर तुमचे कॉल आणि चॅट सुरू ठेवू शकता. याशिवाय, स्काईप अ‍ॅप वापरकर्त्यांना टीम्स डाउनलोड करण्यास आणि त्यावर स्थलांतर करण्यास देखील प्रवृत्त करेल. मायक्रोसॉफ्टने याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांनी अशा अहवालांवर भाष्य केलेले नाही. मायक्रोसॉफ्टने ३१ जुलै २०२१ रोजीच Skype for business बंद केले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »