मुंबई : News Network
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका टीसीएस मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हे प्रकरण अतुल सुभाषसारखेच असल्याचे म्हटले जात आहे. अतुलप्रमाणेच, मानव शर्मानेही त्याच्या पत्नी आणि सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता त्याची पत्नी निकिता शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. पत्नी निकिता यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. निकिता यांच्या दाव्यामुळे आता हे प्रकरण वेगळे वळण घेत आहे.

मानव यांची पत्नी निकिता शर्मा यांनी आपल्या प्रत्युत्तरात म्हटले की, मानवने यापूर्वी तीनदा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा मी स्वत: फास कापून त्याला वाचवले. त्याला वाचवल्यानंतर, मी २३ फेब्रुवारी रोजी त्याला आग्य्राला आणले. तो स्वत: आनंदाने मला घरी सोडला. पुरुषांचे कोणी ऐकत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.
पत्नी निकिता यांनी सांगितले की, माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझ्यामुळे तो आत्महत्या करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. पण त्या सर्व गोष्टी माझा भूतकाळ होत्या. त्या सर्व गोष्टी लग्नाआधी घडल्या होत्या.
दरम्यान आता टीएसच्या मॅनेजर मानव यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मानव यांचे वडील म्हणाले, त्यांचा मुलगा पत्नीच्या छळामुळे त्रस्त होता. निकिताचे अनेक बॉयफ्रेंड होते. लग्नापासून निकिताचा आमच्याबद्दलचा दृष्टिकोन बरोबर नव्हता. जेव्हा ती मानवला भेटण्यासाठी मुंबईला गेली तेव्हा तिथेही त्यांच्यात भांडणे सुरू झाली. ती मानवला सांगायची की मला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडले आहे. मला तू आवडत नाहीस. माझे प्रेम दुसरेच कोणीतरी आहे. हीच गोष्ट माझ्या मुलाला नेहमीच त्रास देत होती. २३ फेब्रुवारी रोजी दोघेही आग्य्राला आले तेव्हाही मुलाच्या सासरच्यांनी त्याचा खूप अपमान केला. म्हणूनच माझ्या मुलाने नैराश्यामुळे आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला.