बिजींग : News Network
Humanoid Robot | सध्या संपूर्ण जगभरात आर्टिफीशियल (AI) इंटेलिजन्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. सध्या जगभरात एआयचा वापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये Humanoid Robot ही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. (China News)

चीनमध्ये (China)आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित होणा-या रोबोटने माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. Android सॉफ्टवेअरमध्ये काही गडबड झाल्याने हा रोबोट अनियंत्रित झाला आणि लोकांना मारण्यासाठी धावला. यानंतर काही लोकांनी त्या रोबोटला पकडले. ही घटना चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. (AI Humanoid Robot Attack in China)
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक Humanoid Robot लोकांवर धावून जाताना दिसत आहे. तो गर्दीत शिरून लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला सिक्युरिटी गार्डने पकडून कंट्रोल केले आणि मागे खेचले. या काळ्या रंगाच्या रोबोटला कपडेही घातलेले होते. (china latest AI news)