वॉशिंग्टन : News Network

अमेरिकेची कार कंपनी Alef Aeronautics ने आकाशात उडणा-या कारचा पहिला व्हिडीओ जारी केला. ही कार जेम्स बाँडच्या कारप्रमाणे फँटसी वाटते. कॅलिफोर्नियातील या कार निर्मिती कंपनीने आपल्या इलेक्ट्रीक कारचा रस्त्यावर अन्य एका कारच्या वरुन उडतानाचा फुटेज जारी केला आहे. या कारला शहरात चालविण्यासाठी Run-way (धावपट्टी) ची गरज नाही. यासाठी व्हर्टिकल टेकऑफची त्याला सुविधा दिलेली आहे. या कारचा Vertical Takeoff चा हा जगाच्या इतिहासातील पहिला व्हिडीओ जारी केल्याचा दावा कंपनीने केला आहे. या व्हिडीओ फूटेजमध्ये कारला व्हर्टिकल टेक ऑफ घेताना पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आतापासून या कारला खरेदी करण्याचा मनसुबे तिचे चाहते रचू लागले आहेत.
किती असणार किंमत?
या flying car ची अजूनपर्यंत मार्केटमध्ये एन्ट्री झालेली नाही. या कारच्या किंमतीची चर्चा यापूर्वीपासून सुरु आहे, अलेफ एरोनोटच्या मते या उडणा-या कारची किंमत २.५ कोटी रुपये आहे. एका सामान्य कारसारखी ती रस्त्यावर देखील ती चालू शकते.