khabarbat

The Supreme Court today gave a landmark judgment in which the court approved the sub-classification of states into Scheduled Castes and Tribes. This decision will allow states to be sub-classified into SC-ST reservation.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

पुरुषांनाही पिरियड्स पाहिजे होते! असे का म्हणाले सुप्रीम कोर्ट वाचा… 

 

Khabarbat News Network 

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका निकालावर टीका करीत पुरुषांनाही मासिक धर्म असायला हवा होता, अशी संतप्त टिपण्णी केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाने एका महिला न्यायाधीशांना तिची कामगिरी निराशाजनक असल्याने बडतर्फ केले होते. गर्भपातामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा हा निकाल देताना कोणताही विचार केलेला नसल्याचे मत सुप्रीम कोर्टाने मांडले. सुप्रीम कोर्टाच्या न्या.बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सिव्हील जजेसच्या बडतर्फीचे मानदंड काय आहेत याचे स्पष्टीकरण मध्य प्रदेश हायकोर्टाकडून मागितले आहेत.

हे पण वाचा : नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

न्यायाधीश नागरत्ना यांनी महिला न्याय अधिका-याच्या आकलनावर अनेक प्रश्न उपस्थित करीत टिपण्णी केली, ज्यात गर्भपातामुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक आघाताला दुर्लक्षित केले गेले. ते म्हणाले मला आशा आहे की, पुरुष जजेसवर देखील हे मापदंड लागू करायला हवे. असे म्हणायला मी जराही कचरणार नाही की एक महिला गर्भवती झाली आणि तिचा गर्भपात झाला आहे. गर्भपाताने महिलेची मानसिक अवस्था आणि शरीरावर झालेला आघात हे काय असते? आम्हाला वाटते की पुरुषांनाही मासिक धर्म असता तर त्यांना कळले असते हे काय आहे?

६ महिला न्यायाधिश बडतर्फ

मध्य प्रदेश राज्य सरकारने कथित असमाधानकारक कामगिरीमुळे सहा महिला सिव्हील जजेसना बडतर्फ केले होते. याची ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »